Ad will apear here
Next
‘गोगटे-जोगळेकर’च्या विज्ञान विभागाला ‘आयएसओ’
आयएसओ मानांकन दाखवताना शिल्पा पटवर्धन, अ‍ॅड. विजय साखळकर, डॉ. किशोर सुखटणकर आणि सतीश शेवडे, प्रा. विवेक भिडे.

रत्नागिरी : ‘गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. मुंबई विद्यापीठच नव्हे, तर जागतिक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी गुणवत्ता शिक्षण येथे दिले जाते, हे सिद्ध करण्यासाठी या मानांकनाची गरज आहे. आगामी काळात ग्रंथालय आणि कार्यालयीन विभागांनाही हे मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न आहे,’ अशी माहिती रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी कार्यवाह सतीश शेवडे, उपकार्याध्यक्ष अ‍ॅड. विजय साखळकर, आनंद देसाई, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, आयएओ प्रमाणपत्र समितीचे प्रमुख डॉ. पी. पी. कुलकर्णी, डॉ. राजीव सप्रे, उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे उपस्थित होते.

पटवर्धन म्हणाल्या, ‘पुढील तीन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र ग्राह्य राहणार असून, हे प्रमाणपत्र विज्ञान शाखेच्या पदवी व पदव्युत्तर विभागासाठी आहे. फेब्रुवारीमध्ये याची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज भरणे, त्यानंतर प्राध्यापकांना प्रशिक्षण, ठराविक पद्धतीने माहिती व सूचनांद्वारे सुधारणा, मानांकनपूर्व तपासणी अशा टप्प्यांवर काम करण्यात आले. यासाठी सोलापूरच्या यश कन्सल्टन्सीच्या यशवंत पत्की व लिड ऑडिटर ओंकार पत्की यांचे मार्गदर्शन लाभले. आयएसओ समितीमध्ये १३ प्राध्यापक कार्यरत होते. विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापकांचे कामाचे यश, सहकार्य, एकता यामुळे हे प्रमाणपत्र मिळाले.’

‘आयएसओ ९००१’मध्ये नमुना, विकास, उत्पादन, उभारणी व सेवा याबद्दल गुणवत्तेची ग्वाही देण्यात येते. ‘क्यूएमएस ०८१८०२०२४७’ या क्रमांकांचे प्रमाणपत्र जीएमबीएच जर्मनीमधून मिळाले आहे. कोकणातील अग्रमानांकित असलेल्या गोगटे महाविद्यालयाला हा मान प्रथमच मिळाला आहे.

या वेळी बोलताना प्राचार्य डॉ. सुखटणकर म्हणाले, ‘गोगटे-जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील नामवंत महाविद्यालय आहे. येथे कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. कॉलेजमध्ये दोन कँटीन असून, विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतीगृह आहे. यातील वाया व उरलेल्या अन्नपदार्थांवर कंपोस्ट खत बनवणार असून, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी बल्बचा वापर ही वाढवण्यात येणार आहे; तसेच रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडणार्‍या रासायनिक पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्राध्यापक जे वर्गात शिकवणार आहेत किंवा वेगळा प्रयोग करणार आहेत, त्याची माहिती व्हिडिओ स्वरूपात किंवा लेखी स्वरूपात कॉलेजच्या वेबसाइटवर अपलोड करावी, असे आवाहनही प्राध्यापकांना केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळेल.’  

आयएसओ मानांकनामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांतून विविध व्यवसाय, उद्योगाच्या संधी मिळतील; तसेच अन्य देशांतील अभ्यासक्रमाशी सामंजस्य करार करणे शक्य आहे. आयएसओ ही संस्था जिनीव्हा येथे स्थापन झाली. भारतासह १०० हून अधिक देश याचे सदस्य आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZRSBS
Similar Posts
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार रत्नागिरी : चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशाला, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांमधील माजी विद्यार्थी असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला
‘गोगटे-जोगळेकर’च्या मराठी वाङ्मय मंडळाचे यश रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या वतीने साडवली (देवरुख) येथे जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या पाच विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.
रत्नागिरीतील ई-कचऱ्यावर होणार प्रक्रिया रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि मुंबईतील इकोरॉक्स या सामाजिक संस्थेत सामंजस्य करार झाला असून, या अंतर्गत महाविद्यालयामार्फत गोळा केल्या जाणाऱ्या ई-कचऱ्यावर ‘इकोरॉक्स’तर्फे प्रक्रिया केली जाणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language